तेलंगणात भाजपा स्वबळावर लढणार;बंडारू दत्तात्रेय यांची माहिती
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :03-Feb-2019
 
 
 
 
 
हैदराबाद, 
 
 
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा तेलंगणात कोणत्याही पक्षासोबत युती करणार नाही आणि सर्व 17 जागा स्वबळावर लढणार आहे, अशी माहिती पक्षाचे वरिष्ठ नेते बंडारू दत्तात्रेय यांनी आज रविवारी येथे दिली.
 
 
 
 
भाजपाने यावेळी 400 जागा िंजकण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे, ते गाठण्यासाठी भाजपाने जय्यत तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच भ‘ष्टाचारमुक्त सरकार दिले आहे. त्यांची लोकप्रियताही सातत्याने वाढत आहे, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
 
 
 
 
अलीकडेच झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत भाजपाला यश मिळाले नाही, पण स्थानिक निवडणुका आणि राष्ट्रीय निवडणुकांचे मुद्दे वेगळे असतात. भाजपा राज्यातील लोकसभेच्या सर्व 17 जागा विकास आणि सुशासनाच्या मुद्यावरच लढविणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
 
 
जे लोक आज पंतप्रधान मोदी यांच्यावर भ‘ष्टाचाराचे आरोप करीत आहेत, ते स्वत: भ‘ष्टाचारात आकंठ बुडाले आहे आणि अल्पसं‘यकांच्या मतांवर डोळा ठेवून, ते मोदींवर निराधार आरोप करीत आहेत, असे ते म्हणाले. राहुल गांधी असो, ममता बॅनर्जी असो िंकवा चंद्राबाबू नायडू असा, यातील कुणीही मोदी यांची बरोबरी करू शकत नाही, असा दावाही त्यांनी केला.