बोको हरामचे नायजेरियात थैमान, 60 ठार
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :03-Feb-2019
 
 
 
 

 
 
 
रण, 
 
 
 
बोको हराम या दहशतवादी संघटनेने नायजेरियातील ईशान्येकडील रण शहरात आणखी एक हल्ला केला. या हल्ल्यात 60 जण ठार झाले. अॅम्नेस्टी इंटरनॅशनल नायजेरियाचे संचालक ओसाई ओझिगो यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. ठार झालेले नागरिक युद्धजन्य स्थितीमुळे स्थलांतरित झालेले होते. त्यांचे हत्याकांड घडविणार्‍यांना कायद्यासमोर खेचून आणले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
 
 
या घटनेच्या साक्षीदारांनी सांगितले की, येथील नायजेरियन सैनिक या हल्ल्याच्या एक दिवस आधीच त्यांच्या जागा सोडून पळून गेले होते. ते सर्वजण येथील नागरिकांचे संरक्षण करण्यात अपयश आल्याची माहिती वरिष्ठांना देण्यासाठी तेथून निघून गेले होते, असेही ओझिगो यांनी सांगितले. दोन आठवड्यांपूर्वीच दहशतवाद्यांनी येथील सैनिकांना पळवून लावले होते. हा बोको हरामचा एक मोठा हल्ला आहे.
 
 
दहशतवाद्यांनी हे शहर ताब्यात घेतल्यानंतर दोन आठवड्यांत हा हल्ला करण्यात आला. त्यांनी गार्शिगर समाज आणि बोर्नो येथील मोबार स्थानिक सरकारच्या परिसरावर मोठे हल्ले चढवले आहेत
बोको हराम हा पश्चिम आणि मध्य आफि‘केतील इस्लामिक दहशतवादी गट आहे. त्यांनी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेशी युती केली आहे. हा गट पाश्चिमात्य शहरीकरण, शिक्षणाच्या विरोधात आहे. नायजेरियामध्ये शरिया कायदा आणणे, हे त्यांचे उद्दिष्ट आहे.