'एयर इंडिया' च्या नाश्त्यात सापडले झुरळ
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :03-Feb-2019
भोपाळ:
 
 
एअर इंडियाच्या भोपाळ-मुंबई या विमानातल्या एका प्रवाशाच्या नाश्त्यात झुरळ आढळले. एअर इंडियाच्या एआय-६३४ या विमानाने शनिवारी सकाळी भोपाळहून मुंबईसाठी निघालेले रोहीतराज सिंह चौहान या प्रवाश्याच्या इडली वडा सांबर नाश्त्यामध्ये एक मृत झुरळ आढळले. रोहितराज यांनी विमानातील कर्मचाऱ्यांचेही याकडे लक्ष वेधले. मात्र, त्यांनी तक्रारीकडे सर्रास दुर्लक्ष केला असल्याचा आरोप रोहितराज यांनी केला. 
 

 
 
मुंबई विमानतळावर आल्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, एअर इंडियाचे व्यवस्थापक राजेंद्र मल्होत्रा यांनी हा आरोप फेटाळून लावला. अशी कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.