उपोषणाच्या पाचव्या दिवशी अण्णांची प्रकृती बिघडली
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :03-Feb-2019
 
 
 
 

 
 
 
 
 
लोकपाल आणि लोकायुक्तांची नियुक्ती आणि इतर मांगण्यांसाठी पाच दिवसापासून उपोषणाला बसलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडली आहे. अण्णा हजारेंच्या यकृतावर परिणाम झाले असून त्यांना रक्तदाबाचाही त्रास होऊ लागला आहे. उपोषण सुरुच राहिले तर किडनी आणि मेंदूवर वाईट परिणाम होऊ शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले आहे . अण्णांच्या प्रकृतीची वेळोवेळी डॉक्टरांच्या पथकाकडून तपासणी केली जात आहे.
 
 
 
 
 
सरकारी वैद्यकीय पथकाने अण्णांची तपासणी केली. अण्णांच्या यकृतातील बिलिरुबिनचे प्रमाण वाढत आहे. बिलिरुबिन हे यकृतातील द्रव्य असून रक्तातील तांबड्या पेशी मृत झाल्यावर बिलिरुबिन तयार होते. उपोषण सुरूच ठेवले तर त्यांच्या किडनी आणि मेंदूवर वाईट परिणाम होऊ शकतो अशी माहिती डॉ. भारत साळवे यांनी दिली आहे.