भारताचा दमदार विजय; मालिका ४ - १ ने जिंकली
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :03-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
वेलिंग्टन  
 
अंबाती रायुडूची दमदार खेळी, अचूक गोलंदाजी आणि महेंद्रसिंग धोनीचे चाणाक्ष यष्टीरक्षकाच्या जोरावर भारताने शेवट गोड केला. पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 35 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने एकदिवसीय मालिका 4-1 अशा फरकाने खिशात टाकली.
भारताने अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. मात्र १८ धावांवर ४ खेळाडू बाद झाले होते.  पण त्यानंतर रायुडूने 8 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 90 धावांची दमदार खेळी साकारली. त्याचबरोबर हार्दिक पंड्या आणि विजय शंकर यांनी प्रत्येक 45 धावांची खेळी खेळल्यामुळे भारताला २५२ चे लक्ष्य देता आले. 
भारताच्या गोलंदाजांनाही यावेळी भेदक मारा केला. फिरकीपटू युजवेंद्र चहलने तीन विकेट्स मिळवल्या. मोहम्मद शमी आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.