राजकीय सभेतून परत येणाऱ्या बस ला अपघात
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :03-Feb-2019
 
 
 
 
 

 
 
 
 
 
 
झारखंडमधील देवघर जिल्ह्यातील कछुआबंध गावाजवळ राजकीय सभेतून परत येत असताना प्रवासी बस उलटून ५ जणांचा मृत्यू झाला.  मृतांमध्ये तीन महिला आणि एक लहान मुलाचा समावेश असून जवळपास 30 जण जखमी झाले आहेत. 
 
 
पोलीस अधिकारी ए. उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. हे सर्वजण शेजारील दुमका जिल्ह्यात एका राजकीय सभेमध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते. सभेनंतर बाघमारा गावात परत असताना ही भीषण दुर्घटना घडली.एका वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस उलटली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
 
 
दरम्यान, जखमींना सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे . तसेच काहींवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.दुसरीकडे, या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबायींना प्रशासनाकडून 50,000 रुपयांची मदत घोषित करण्यात आली आहे.