अंदमान-निकोबार बेटांवर लवकरच रेल्वेचे जाळे
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :03-Feb-2019
 
 
 
 
 
 

 
 
 
 
 
नवी दिल्ली,
 
 
 
अंदमान-निकोबार बेटावर लवकरच रेल्वेमार्गाचे काम सुरू केले जाणार आहे. किनारपट्टीला लागून असलेल्या 240 किमी लांब रेल्वेमार्गावर पूल आणि रेल्वेस्थानक उभारले जाईल.
 
 
 
हा रेल्वेमार्ग पोर्टब्लेअरला दिगलीपूरशी जोडणार असून दोन बेटांना जोडणारा हा पहिला रेल्वेमार्ग असेल. त्यामुळे ही दोन्ही बेट रेल्वेच्या नकाशावर येतील. सध्या ही दोन शहरे बससेवेने जोडली असून त्यासाठी सडकमार्गे 350 किमी अंतर पार करावे लागते. बसने 14 तास तर जहाजाने 24 तास लागतात. किनारपट्टीलगत उभारला जाणार्‍या रेल्वेमार्गासाठी 2413.68 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या रेल्वेमार्गामुळे बेटांवरील पर्यटनाला चालना मिळणार आहे.
 
 
 
ईशान्येकडील राज्यांच्या सीमांची सुरक्षा पाहता संरक्षण मंत्रालयाच्या रणनीतीच्यादृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरू शकतो, असे रेल्वेच्या नियोजन विभागाला वाटते. प्रसिद्ध काश्मीर िंलकप्रमाणेच हा राष्ट्रीय प्रकल्प मानला जात असून त्यासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्याची आवश्यकता राहील.