पाक चीनला करणार गाढवांची निर्यात
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :03-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
इस्लामाबाद
 
 
गाढवांच्या संख्येत जगात तिसर्‍या क्रमांकावर असलेला पाकिस्तान, मित्रराष्ट्र चीनला लवकरच मोठ्या प्रमाणात गाढवांची निर्यात करणार आहे. दोन्ही देशांमध्ये सुरू होत असलेल्या या नव्या व्यापारातून पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात महसूल मिळणार आहे.
चीनमध्ये गाढवांना फार जास्त िंकमत प्राप्त आहे. विशेषत: चीनमधील पारंपरिक औषधांच्या निर्मितीत गाढवाच्या कातड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. रक्त शुद्ध ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकात्मक शक्ती वाढविण्यासाठी ही औषधे अतिशय उपयुक्त मानली जातात.
 
 
गाढवांच्या संख्येत चीन जगात अव्वल असून, पाकिस्तान तिसर्‍या क‘मांकावर आहे. या देशात 50 लाखांवर गाढवे आहेत. पाकिस्तानातून गाढवांची खरेदी करण्यासाठी चीनमधील व्यावसायिक आणि अन्य बड्या कंपन्या इच्छूक आहेत, तसेच अनेक चिनी कंपन्या पाकिस्तानातच गाढवांचे संवर्धन करण्याच्या व्यवसायातसाठीही इच्छूक आहेत, अशी माहिती खैबर प‘तुन‘वा प्रांतातील वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.
 
 
 
चीनची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पाकिस्तान सरकारने देशातील गाढवांची सं‘या वाढविण्याची तयारी दर्शवली असून, यासाठी विशेष केंद्रांची स्थापना केली जाणार असल्याचे अधिकार्‍याने सांगितले.