सीमांचल एक्स्प्रेसला अपघात; ७ जणांचा मृत्यू
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :03-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
पटना:
बिहार हाजीपूरजवळ सहदेईजवळ सीमांचल एक्सप्रेसचे ९ डबे रुळावरून घसरले असून या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
हाजीपूर-बछवाडा दरम्यान जोगबनीहून नवी दिल्लीला जाणाऱ्या या सीमांचल एक्सप्रेस चे ९ डब्बे पहाटे ४ वाजता रुळावरून घसरले. हा अपघात इतका भीषण होता की, एक्स्प्रेसचे डबे एकमेकांवर आले असे सांगितले जात आहे. . एक द्वितीय श्रेणीचा डबा, वातानुकूलित बी३, एस८, एस९, एस१० या डब्यांसह आणखी चार डबे रुळांवरून घसरले असून अपघात रेल्वे रुळाला तडा गेल्याने झाले असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
 
 
 
 
 
 
 
रेल्वेने अपघातातील मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी ५ लाख रुपये, गंभीर जखमींना १ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे.
 

 
घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले असून एनडीआरएफची दोन पथके घटनास्थळी आहे. तसेच रेल्वेची मेडिकल व्हॅन आणि डॉक्टरही घटनास्थळी दाखल झाले आहे.