स्टेट बँकेकडील ग्राहकांचा डाटा सुरक्षित : बँकेचे स्पष्टीकरण
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :03-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
मुंबई :  
 
 
बँकांकडील डाटा सुरक्षित नसल्याने त्याच्या आर्थिक तोट्याचा फटका ग्राहकांना बसण्याची भीती असते. अशातच ग्राहकांचा स्टेट बँक ऑफ इंडियाकडील डाटा सुरक्षित नसल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. मात्र, स्टेट बँक प्रशासनाने ही बाब फेटाळून लावली आहे.
 
 
रिझर्व्ह बँकेचे सर्व्हर हे संपूर्ण सुरक्षित आहेत. त्यामध्ये कोणतीही छेडछाड झाल्याची शक्यता बँकेने फेटाळून लावली आहे. स्टेट बँकेकडील ग्राहकांच्या खात्यांचा डाटा असलेल्या सर्व्हरला पासवर्ड नसल्याचे प्रकाशित वृत्तात म्हटले होते.
 
 
 
ग्राहकांचा डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी मुलभूत संरक्षण आहे. दूरसंचार कंपन्यांकडून देण्यात येणार्‍या सेवेसाठी कठोर आचारसंहिता आहे. तपास केला असता यामध्ये २७ जानेवारीला काही त्रुटी आढळल्या आहेत. ग्राहकांचा डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जाणार आहेत. ग्राहकांना देण्यात येणार्‍या सेवांबाबत कोणत्याही त्रुटी राहू नये, याची काळजी घेण्यात येणार असल्याचे एसबीआयने स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षी पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरचा डाटा हॅक करण्यात आला होता. त्या घटनेत सायबर गुन्हेगारांनी कोट्यवधींचा गंडा बँकेला घातला होता.