पोलिस-नक्षल चकमकीत महिला ठार
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :03-Feb-2019
 
 
 

 
 
 
 
 
रायपूर :
 
 
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत एका महिलेचा मृत्यू झाला. येथील जंगलात चकमक सुरू असताना जवळच दोन महिला काम करीत असल्याचे पोलिसांना दिसले. या महिलाही नक्षलवादीच असाव्या, असा पोलिसांचा समज होता. तथापि, त्या जवळच्या गावातील रहिवासी असल्याचे समजले. या चकमकीत यातील एका महिलेला गोळी लागली आणि तिचा जागीच मृत्यू झाला, असे पोलिस अधिकार्‍याने सांगितले.