डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेवर आणीबाणी लावण्याच्या तयारीत
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :03-Feb-2019
 
 
 
 
 
 

 
 
 
 
 
अमेरिकेत होणारी घुसखोरी रोखण्यासाठी देशाच्या सीमेवर भिंत बांधण्याचा निर्णय ट्रम्प सरकार घेतले असून त्यास अमेरिकेच्या संसदेकडून मंजुरी मिळविण्यात अडचणी येत आहे. यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. असे वृत्त अमेरिकेतील दैनिकांमध्ये प्रकाशित झाले आहे. 
 
मेक्सिकोतून घुसखोरी रोखण्यासाठी अमेरिकेच्या सीमेवर भिंत बांधण्याचा प्रकल्प ट्रम्प सरकार ने संसदेसमोर मांडला होता. परंतु अमेरिकेतील ट्रम्प यांच्या विरोधी पक्षातील सदस्यांनी या प्रकल्पाला विरोध करीत त्यांचा हा प्रस्ताव रोखून धरला आहे. तसेच भिंतीसाठी पैसे मिळविण्यासाठी अमेरिकेच्या संसदेकडून परवानगी घ्यावीच लागेल. जर आणीबाणी जाहीर केली तर ट्रम्प यांना संसदेची अनुमती न घेता या प्रकल्पासाठी पैसे मिळवणे सोपे जाणार आहे. त्यामुळे देशात आणीबाणी लागू करण्याचा विचार ट्रम्प करत आहे.  
 
याबाबत बोलताना ट्रम्प यांनी सांगितले की " सीमा सुरक्षतेबाबत विरोधी पक्षासोबत चर्चा म्हणजे वेळेचे अपव्यय आहे. घुसखोरी आणि त्या वरील उपाययोजनांबाबत अमेरिकी प्रतिनिधी सभेच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांची भूमिका पूर्णपणे चुकीची आहे."