ऋषिकुमार शुक्ला यांनी पदभार स्वीकारला
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :04-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली,
 
 
सीबीआयचे संचालक म्हणून अलीकडेच नियुक्ती करण्यात आलेले ऋषिकुमार शुक्ला यांनी आज सोमवारी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली आहेत.
 
 
गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड मंडळाच्या झालेल्या बैठकीत, 1983 च्या तुकडीचे पोलिस अधिकारी असलेले शुक्ला यांची सीबीआयच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. आज सकाळी सीबीआयच्या मु‘यालयात जाऊन त्यांनी पदभार स्वीकारला, अशी माहिती सीबीआयचे प्रवक्ते नितीन वाकणकर यांनी पत्रपरिषदेत दिली.