फाईव्ह-जी स्पेक्ट्रम लिलावावरून दूरसंचार कंपन्यात मतभेद
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :04-Feb-2019
या कंपन्यांमध्ये व्होडाफोन आयडिया, भारती एअरटेल व रिलायन्स जिओ इन्फोकॉम यांचा समावेश आहे. जिओला सर्व उपलब्ध स्पेक्ट्रमचा तातडीने लिलाव व्हावयास हवा असून त्यासाठी भारतीय दूरसंचार नियमन प्राधिकरणा(ट्राय)ने सुचविलेल्या किंमतींबद्दल कुठलीही समस्या तिला वाटत नाही. तर भारती एअरटेलने 2018-19 या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत फक्त फोर-जी स्पेक्ट्रमचाच लिलाव व फाईव्ह-जीचा लिलाव पुढील आर्थिक वर्षातच होण्यावर भर दिलेला आहे. तसेच स्पेक्ट्रमच्या किंमती घटविण्याचीही मागणी केलेली आहे.
 
देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडियाने तर 2010 पर्यंत कुठलाही लिलाव केला जाऊ नये, अशी इच्छा व्यक्त केली आहे. तसेच सरकारने तोपर्यंत दूरसंचार क्षेत्राची स्थिती सुधारण्याची योजनाही मांडलेली आहे.
या मतभेदांच्या परिणामी सरकारला कुठल्याही स्पेक्ट्रम लिलावाचा कार्यक्रम जाहीर करता आलेला नाही. सुत्रांच्या म्हणण्यानुसार 2018-19 या आर्थिक वर्षात कुठल्याही प्रकारे लिलावाची शक्यता नाही. कारण, दूरसंचार उद्योगावर तब्बल 7 लाख कोटी रुपयांच्या कर्जाचे ओझे आहे. या स्पेक्ट्रमची विक्री टप्याटप्यांमध्ये केली जाऊ शकते.
2016 मध्ये सुरू झालेल्या जिओने स्पेक्ट्रमच्या लिलावामध्ये कुठल्याही प्रकारच्या विलंबास विरोध केलेला आहे. उलट अधिक स्पेक्ट्रम खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे. सरकारने नियमितपणे लिलावाची कार्यवाही केली पाहिजे. त्यामुळे दूरसंचार कंपन्यांना आपले नेटवर्क व त्याचा दर्जा अधिक चांगल्या रीतीने वाढविता येणार असल्याचेही कंपनीचे म्हणणे आहे.
जिओचा मुख्य भर डेटाची वाढती मागणी पूर्ण करण्यावर असून त्यासाठीच त्याला स्पेक्ट्रमची संख्या वाढविण्याची गरज आहे. जिओच्या ग्राहकांची संख्याही वेगाने वाढू लागलेली आहे. कंपनीने गेल्या सप्टेंबरात सव्वा कोटींपेक्षा अधिक युझर्स जोडले आहेत. याबरोबरच तिच्या युझर्सची संख्या वाढून 25 कोटींपेक्षाही अधिक झालेली आहे. व्होडाफोन आयडिया व भारती एअरटेल या प्रतिस्पर्धी कंपन्यांना 90 लाख युझर्स गमवावे लागले आहेत.

 
 
ट्रायच्या वतीने सुचविण्यात आलेले फाईव्ह-जी स्पेक्ट्रमचे सर्व दर जिओने मान्य केले आहेत. ट्रायने ऑगस्टमध्ये फोर-जी बॅण्डसह फाईव्ह-जी स्पेक्ट्रमच्या लिलावाचीही शिफारस केलेली होती. ट्रायने प्रिमियम 700 एमएचझेडची बेस प्राईस (पायाभूत किंमत) 43 टक्क्यांनी घटवून 6568 कोटी रुपये प्रति युनिट केली होती. तसेच फाईव्ह-जी स्पेक्ट्रमसाठी सुमारे 500 कोटी रुपये प्रति युनिटची किंमत ठरविली होती. भारती एअरटेल याच आर्थिक वर्षात स्पेक्ट्रम खरेदी करू इच्छित आहे; पण कंपनीला यासाठी किंमतीत कपात हवी आहे.
 
त्यामुळे या स्पेक्ट्रमचा लिलाव नेमका केव्हा करण्यात येईल, हे सांगणे अवघड झाले आहे. केवळ एकाच कंपनीला सर्व स्पेक्ट्रम विकत घेऊ दिले जाणे, याचा अर्थ मक्तेदारीला प्रोत्साहन देणे, असा काढला जाऊ शकतो. तसेच या मुद्यावर कंपन्या न्यायालयातही धाव घेऊ शकतात.
अमेरिकन आंतरराष्ट्रीय व्यापार आयोगाने भारत व चीनमधून आयात केल्या जाणार्‍या िंसथेटिक फ्लोरो पॉलिमरवर डंिंपग शुल्क न लावण्याचा निर्णय घेतलेला आहे. फ्लोरोपॉलिमरचा वापर भोजन तयार करणार्‍या भांड्यांना नॉन स्टिक आवरण लावण्यासाठी केला जात असतो.
 
आयोगाच्या म्हणण्यानुसार भारत व चीनमधून आयात करण्यात आलेले पॉलीटेट्राफ्लोरा इथिलिन रेसिन अमेरिकेत योग्य किंमतीत विकले गेले होते. या निर्यातीच्या बाबतीत विदेशी कंपन्यांना फारसे यश क्वचितच मिळत असते. भारताने मात्र ते मिळवून चांगली कामगिरी केलेली आहे.
सोन्याची चमक वाढली, साडेपाच वर्षातील विक्रमी भाव
मौल्यवान धातू मानले गेलेल्या सोन्याची चमक सध्या वाढली असून ते बुधवारी 30 रोजी प्रति दहा ग्रॅममागे 32 हजार 955 रुपयांपर्यंत पोहोचले होते. गेल्या साडेपाच वर्षातील हा सर्वात विक्रमी भाव या पिवळ्या धातूला मिळालेला आहे. वस्तुत: जागतिक बाजारातच तेजी आलेली असून अमेरिकेतील सोन्याचा भाव गेल्या आठ महिन्यातील सर्वोच्च स्तरावर म्हणजे प्रति औसामागे 1300 डॉलरच्या वर गेलेला आहे. याआधी सोन्याने प्रति दहा ग्रॅम 33 हजार रुपयांच्या पलीकडीलही मजल गाठलेली होती; पण गेल्या काही वर्षांपासून ते 30 हजारांखाली गेले होते. सध्याच्या लोकसभा निवडणूकीसंदर्भात राजकीय परिस्थितीच्या अनिश्चिततेमुळे सोन्याच्या भावात वाढ होऊ लागलेली आहे. चांदीही प्रति किलोग्रॅममागे 40 हजार रुपयांच्या वर आलेली आहे. कच्च्या खनिज तेला (क्रूड ऑईल)च्या भावांनीही प्रति िंपपामागे 3000 रुपयाच्याही खाली गाठलेल्या नीचांकातून 3800 रुपयांच्या वर उसळी घेतलेली आहे.
--------