मोदींचा प्रचार करण्यासाठी बुलेट रॅलीचे बुलढाण्यात स्वागत
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :04-Feb-2019
 

 
 
बुलढाणा :
मोदी सरकारने आपल्या कार्यकाळात महिलांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. त्यांना आगामी २०१९ च्या लोकसभा  निवडणूकीत निवडून आणून देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा विराजमान करण्याकरीता देशातील कनार्टक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, हरियाणा व दिल्ली या राज्यातील १५५ जिल्ह्यात मोदींचा प्रचार-प्रसार करण्यासाठी बंगळुरू येथून मकरसंक्रातीलच्या पर्वावर बुलटने १५ हजार किलोमीटरची सडक यात्रा दिल्लीपर्यत करणार असल्याची माहिती लिग राईटस काऊसीलच्या सरचिटणीस राजलक्ष्मी नंदा यांनी दिली आहे.