' जोरा ' रोबोट करणार वयोवृद्ध नागरिकांचे देखभाल
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :04-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
पॅरिस 
 
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये वयाेवृद्ध नागरिकांच्या देखभालीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स-एअाय) नेटवर्कपासून बनवलेले 'जोरा' रोबोट बनविण्यात आले आहे. कारण तेथे एका प्रकल्पांतर्गत वृद्धाश्रमांत व रुग्णालयांत ज्येष्ठ नागरिकांचा सांभाळ करण्यासाठी हे रोबोट सकाळी उठण्यापासून ते झाेेपण्यापर्यंतच्या सर्व शारीरिक क्रियांत वृद्धांना मदत करत आहेत. या रोबोटला ' जोरा ' असे नाव देण्यात आले आहे . ज्येष्ठ नागरिकांना व्यायाम कसा करावा, हे देखील रोबोट सांगतात. एवढेच नव्हे, तर त्यांच्याकडून नियमितरीत्या व्यायाम करवून घेतात व त्यांना बगिच्यातही मॉर्निंग वॉकला  घेऊन जातात. या रोबोट‌्सचे वैशिष्ट्य म्हणजे, एखाद्या ज्येष्ठ नागरिकास एकटेपणा व उदास वाटत असेल तर स्वत:च्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून ते गाणे एेकवतात. तसेच नृत्य करून त्यांचे मनोरंजनही करतात.
 
 
 
 
 
 
 

 
 
 
 
 
मुलांसारखे दिसणाऱ्या या रोबोटकडून सेवा घेणाऱ्या सोफी यांनी सांगितले की, हे रोबोट नियमितपणे आमचे रक्तदाब तपासतात, अाैषधे घेऊन येतात व अाम्हाला घेण्यास सांगतात. लहान मुलांप्रमाणे त्यांच्या नटखट हालचालींमुळे एकटे असल्याची जाणीवही हाेत नाही. ते २४ तास अामची खूप काळजी घेतात. अामच्या केंद्रात १६ ज्येष्ठ नागरिक अाहेत. विशेष म्हणजे, आराम करताना डिस्टर्बही करत नाहीत व कोणी उशिरापर्यंत खाेलीतून बाहेर न पडल्यास बाेट धरून इतर जण असलेल्या ठिकाणी नेतात.
बेल्जियममधून आणलेल्या रोबोट ची  किंमत सुमारे १३ लाख आहे.  फ्रान्सने या केअरटेकर 'जोरा' रोबोट‌्सना बेल्जियमच्या एका कंपनीतून मागवले अाहे. एका रोबोटची किंमत १२ लाख ७८ हजार रुपयांच्या जवळपास अाहे. हल्ली अमेरिका, अाशियासह अरब देशांत अशा हजार रोबोट‌्सचा पुरवठा केला.