मोदीप्रेमातून एकत्र आलेल्या जोडप्यात कलह
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :04-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
मुंबई,
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील प्रेमापोटी एकत्र आल्याचे सांगत सोशल मीडिया गाजवणार्‍या गुजरातच्या जय दवे आणि अल्पिका पांडे यांच्या नात्यात दुरावा आल्याचे वृत्त आहे. जयने आपला शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप अल्पिकाने केला आहे.
 
 
 
या संदर्भात सोशल मीडियावर जयने लिहिले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील आम्ही 31 डिसेंबरला विवाहबंधनात अडकलो. मी कॉंग‘ेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या फेसबूक पेजवर मोदींच्या समर्थनार्थ कॉमेंट केली आणि त्यांच्या मतदारसंघातील सुंदर युवती अल्पिकाने ती लाईक केली. त्यानंतर आम्ही बोललो, भेटलो. आम्हाला देशासाठी जगायचे असून, एकत्र राहण्यासाठी लग्न करायचे ठरवले, असेही जयने म्हटले आहे. यानंतर जयची ही पोस्ट अल्पावधीतच व्हायरल झाली. काही जणांनी दवे दाम्पत्यावर कौतुकाचा वर्षाव केला. कुणी त्यांचे मीम्स बनवत त्यांना ट्रोलही केले. जयने नंतर आपले ट्विट डीलीट केले होते. मात्र, लग्नानंतर जेमतेम महिन्याभरातच अल्पिकाने जयवर व्यभिचार आणि शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. जयने भाजपा आणि स्वतःच्या सोशल मीडिया प्रचारासाठी आपल्या छायाचित्राचा गैरवापर केल्याचा दावाही तिने केला आहे. त्याच्या जाचामुळे आपल्या मनात आत्महत्येचे विचार मनात घोळत असल्याचेही अिल्पिकाने सांगितले. ती म्हणाली की, मी केवळ 18 वर्षांची असून, जय 29 वर्षांचा आहे. सर्वप्रथम, त्याने माझ्या संमतीविना आमचे छायाचित्र ट्विट केले. स्वतःच्या प्रचारासाठी याचा वापर केला. भाजपा आणि सोशल मीडियामध्ये स्वतःची प्रतिमा चमकवण्यासाठी त्याने हा खेळ खेळल्याचा संतापही अल्पिकाने व्यक्त केला.