मनोहर पर्रीकर एम्समध्ये दाखल
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :04-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना स्वादुपिंडाचा कॅन्सर झाल्याचे गेल्या वर्षी निदान झाले होते.  नवी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेत असून त्यांचे विविध वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहेत. यापूर्वी 14 ऑक्टोबर 2018 रोजी पर्रीकर यांना एम्समधून डिस्चार्ज देण्यात आले होते. त्यानंतर आता अडीच ते तीन महिन्यांच्या कालावधीनंतर ते पुन्हा एम्समध्ये दाखल झाले आहेत. गेल्या गुरुवारी गोवा विधानसभेचे तीन दिवसीय अधिवेशन संपल्यानंतर वैद्यकीय तपासण्या करण्यासाठी पर्रीकर नवी दिल्लीकडे रवाना झाले.
 
 
 
पर्रीकरांच्या आरोग्याची आताची स्थिती पूर्वीच्या तुलनेत योग्य आहे की नाही?, याचा अंदाज घेऊनच त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून पर्रीकर आहार म्हणून द्रव पदार्थच घेत आहेत. त्यामुळे शारीरिकदृष्ट्या ते थकले आहेत. जास्त वेळे ते चालू शकत नसून व्हील चेअरचा त्यांना आधार घ्यावा लागतो. पर्रीकरांच्या नाकात असलेली ट्युब काढता येईल का? याचाही अंदाज डॉक्टर घेतील. 
 
कार्डियोलॉजिस्ट  डॉ. कोलवाळकर आणि अन्य डॉक्टरांच्या निगरानीदेखत त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते