भारतीयाने जिंकली तब्बल १९ कोटींची लॉटरी
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :04-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
अबुधाबी, 
 
 
दुबईत नोकरीसाठी गेलेल्या एका भारतीयाला तब्बल 19 कोटी रुपयांची लॉटरी मिळाली आहे.
वृत्तसंस्थानुसार, प्रशांत पंडाराथिल यांनी 4 जानेवारीला ऑनलाईन लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. ही लॉटरी 1 कोटी दिरहॅम एवढी होती. ही रक्कम भारतीय रुपयात 19 कोटी इतकी होते. महत्वाचे म्हणजे लॉटरीच्या मालिकेतील दुसरे बक्षीसही अन्य एका भारतीयालाच लागले आहे. दुबईतील या लॉटरीच्या पहिल्या 10 विजेत्यांमध्ये सहा भारतीय आहेत. गेल्या महिन्यात अनिवासी भारतीय अभिषेक काथेल यांनी दुबईतील करमुक्त लॉटरीमध्ये 10 लाख डॉलर्स म्हणजेच 7.8 कोटी रुपये िंजकले होते.