‘जीसॅट-31’ चे उद्या प्रक्षेपण
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :04-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
बंगळुरू
 
 
 
 
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात्‌ इस्रोने जीसॅट-31 या आपल्या चाळीसव्या संदेशवहन उपग‘हाचे येत्या बुधवारी प्रक्षेपण करण्याची तयारी पूर्ण केली आहे. फ‘ेन्च गुयाना येथील केंद्रातून हा उपग‘ह अंतराळात सोडण्यात येणार आहे.
या उपग‘हाचे आयुष्य 15 वर्षांचे राहणार असून, सध्या अंतराळातील कक्षेत असलेल्या काही उपग‘हांना गती देण्यासोबतच, कु-बॅण्ड ट्रान्सपॉण्डरची क्षमता वाढविण्यासाठी हा उपग‘ह उपयुक्त ठरणार आहे, अशी माहिती इस्रोच्या सूत्रांनी दिली.
 
 
या उपग‘हाचे वजन 2535 किलो असून, फ‘ेन्च गुयानातील कौरोवू येथील केंद्रातून एरियाना-5 या प्रक्षेपकाच्या माध्यमातून तो अंतराळात झेपावणार आहे. व्ही-सॅट नेटवर्क, टेलिव्हीजन अपिंलक, डिजिटल सॅटेलाईट, डीटीएच टेलिव्हीजन सेवा, सेल्युलर बॅक हॉल कनेक्टिव्हिटी आणि अन्य अॅप्सलाही या उपग‘हामुळे गती मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.