स्वयंपाकाला उशीर झाला म्हणून सासू सुनेला चावली
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :04-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
उत्तर प्रदेशातील हरगोविंदनगरमध्ये एक विचित्र घटना शनिवारी रात्री घडली. स्वयंपाक वेळेत झाला नाही म्हणून सासू-सुनेमध्ये जोरदार भांडण झाले आणि रागारागात सासू सुनेच्या हाताच्या बोटांना चावली. 
 
 
सुनेने केलेल्या तक्रारीनुसार, '३२ वर्षीय प्रीती भारती ही आपल्या बाळाला स्तनपान करत होती. त्याचवेळी तिला सासू सुशिला देवी (वय ६५) हिनं स्वयंपाक करण्यास सांगितले. पण बाळाला स्तनपान केल्यानंतर स्वयंपाक करते, असे उत्तर प्रीतीने सासूला दिले. यावरून सासू चिडली आणि ती प्रीतीच्या उजव्या हाताच्या बोटांना चावली.'
 
 
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पण तोपर्यंत सासू तेथून पसार झाली होती. पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा नोंदवला असून प्रीतीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिच्या हाताच्या बोटांना चावा घेतल्याचं वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.