मुंबई महापालिकेचे अर्थसंकल्प सादर
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :04-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
मुंबई महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी 2019-20 या आर्थिक वर्षाचा 30 हजार 692 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सोमवारी (4 फेब्रुवारी) स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना सादर केले .
 
 सातवा वेतन आयाेगाच्या अंमलबजावणीसाठी अनावश्यक खर्चावर कपात करणार असून कर्मचा-यांच्या कामाच्या तासांच्या व्यवस्थापनासाठी सुधारणा होणार आहे. तसेच काेस्टल राेड, गाेरेगाव मुलुंड जाेड रस्ता, मलनिस्सारण प्रकल्प, पुलांची दुरूस्ती, रस्त्यांची सुधारणा यासाठी माेठी तरतूद. 
- गोरेगाव- मुलुंड जोडरस्त्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद
- कोस्टल रोडसाठी 1600 कोटींची तरतूद
- बेस्टमधील सुधारणांसाठी 34.10 कोटींची तरतूद
- मुंबईतील रस्तेदुरुस्तीसाठी 1 हजार 520 कोटींची तरतूद
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वसाहतींसाठी 10 कोटींची तरतूद
रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणाली साठी २०१८-१९ वर्षात ६८.४२ कोटी रुपयांची सुधारित तरतूद
- आर्थिक वर्ष २०१९-२० साठी २०६. २५ कोटी रुपये इतकी अर्थसंकल्पीय तरतूद प्रस्तावित आहे.
भगवती रुग्णालय ५९२ कोटी रुपये
एम ती अग्रवाल रुग्णालय ४९८ कोटी रुपये
कूपर रुग्णालय २९० कोटी रुपये
शताब्दी रुग्णालय ५०२ कोटी रुपये
लेप्रसि रुग्णालय १५५ कोटी रुपये
नायर रुग्णालय २५० कोटी रुपये
भाभा रुग्णालय २९७ कोटी रुपये
सायन रुग्णालय ६५० कोटी रुपये
नायर दंत महाविद्यालय १५१ कोटी रुपये
टाटा रुग्णालय हॉस्टेल इमारत ५५ कोटी रुपये