ममता चोर, डाकूंच्या पाठीशी : चौधरी
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :04-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
कोलकाता, 
 
बंगालच्या मु‘यमंत्री ममता बॅनर्जी आणि सीबीआयमधील वादात कॉंग‘ेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ममतांना पािंठबा जाहीर केला असतानाच, या मुद्यावरून कॉंग‘ेसमध्ये फूट पडली आहे. बंगालमधील कॉंग‘ेसचे खासदार अधिररंजन चौधरी यांनी ममता ममता बॅनर्जी चोर आणि डाकूंच्या पाठीशी उभ्या आहेत, असा मोठा आरोप करून, राहुल गांधींनाच तोंडघशी पाडले आहे.
 
 
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चौधरी म्हणाले की, ममता बॅनर्जी चौकशीला घाबरतात, सुमारे 10 हजार कोटी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळ्यात तृणमूल कॉंगे‘सच्या अनेक बड्या नेत्यांचा सहभाग आहे आणि याची माहिती ममतांनाही आहे, असे असतानाही त्या घोटाळेबाजांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत.
 
 
चौकशीसाठी आलेल्या सीबीआय अधिकार्‍यांना अटक करून ममता बॅनर्जी यांनी लोकशाहीचा गळा घोटला आहे. बंगालमध्ये लोकशाही नसून, ममतांची हुकुमशाही आहे, हे आता सिद्ध झाले असल्याने, त्यांचे सरकार बरखास्त करून या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायला हवी, असेही चौधरी यांनी स्पष्ट केले.
 
 
या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून चौकशी केली जात आहे; पण ममता बॅनर्जी या डाकू आणि चोरांची मदत करीत असल्याचे दिसून येत आहे. हे कशा प्रकारचे सरकार आहे, जिथे भ‘ष्ट पोलीस अधिकार्‍याला वाचविण्यासाठी ममता बॅनर्जी धरणे आंदोलन करतात. ममतांना पािंठबा देण्याबाबत कॉंगे‘सच्या केंद्रीय नेतृत्वाचे वेगळे मत असले तरी ममता बॅनर्जी चुकीच्याच आहेत आणि म्हणून मी त्यांच्या या कृत्याचे समर्थन करू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.