ऑस्ट्रेलियात पूर; येत्या ७२ तासांत हवामान बदलण्याची शक्यता
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :04-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
सिडनी
 
अमेरिकेत सर्दीमुळे लोकं त्रस्त असून दुसरीकडे दुष्काळानंतर ईशान्य ऑस्ट्रेलियात पूर आले आहे. पुरामुळे लोकांचे संकट वाढले आहे. हजारो लोकांना घर सोडणे भाग पडत असून येत्या काही दिवसांत पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या शतकातील हा सर्वांत मोठा पूर असल्याचे सांगण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियातील या भागात मान्सूनमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मात्र, नुकताच झालेला पाऊस सरासरीपेक्षा जास्त आहे.
 
 
  
 

 
 
 
 
 
 
क्वीन्सलँड राज्याच्या वरती धिम्या गतीने पुढे जाणारे मान्सून क्षेत्र कमी दाबाचे क्षेत्र बनले आहे. यामुळे काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्य क्वीन्सलँडच्या टाऊन्सविले शहरात हजारो रहिवासी खंडित वीजपुरवठ्यात राहत असून असाच पाऊस सुरूच राहिल्यास २० हजारांहून जास्त घरे जलमय होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हवामान विभागाने येत्या ७२ तासांत हवामान बदलण्याची शक्यता व्यक्त केली आहे.