राज ठाकरे यांनी उपोषणस्थळी जाऊन घेतली अण्णांची भेट
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :04-Feb-2019
 
 
 
 
 
   
 
 
लोकपाल कायद्याच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारे यांना विविध स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. उपोषणामुळं त्यांची प्रकृती खालावत चालली असून त्यांना पाठिंबाही मिळत आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी राळेगणसिद्धी इथे जाऊन अण्णांची भेट घेतली. दोघांमध्ये काही वेळ चर्चाही झाली. 
 

 
 
 
 
अण्णाच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. त्यामुळं सरकारवरही दबाव वाढला आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे आज पुन्हा एकदा सरकारच्या वतीने अण्णांची भेट घेणार आहेत. तत्पूर्वी, राज ठाकरे यांनी उपोषणस्थळी जाऊन अण्णांची भेट घेतली असून लवकरच राज ठाकरे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत.