ममता बॅनर्जी विरुद्ध सीबीआय; सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :04-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
कोलकातामध्ये सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर सर्वोच्च न्यायालयाने तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. शारदा चिडफंड घोटाळ्याप्रकरणी कोलकात्याचे पोलीस आयुक्त रजीव कुमार हे सीबीआयला सहकार्य करीत नाहीत. त्यांना सहकार्याबाबत निर्देश देण्यात यावेत या मागणीसाठी सीबीआयने सुप्रीम कोर्टा याचिका दाखल केली आहे. राजीव कुमार ने सीबीआयला सहकार्य केले नसून चिटफ़ंड घोटाळ्यातील पुरावे ते नष्ट करू शकतात असे आरोप सीबीआईने याचिकेत केले आहे. ते पुरावे नष्ट करू नये म्हणून आजच सुनावणी घेण्यात यावी अशी विनंती सरकारी वकिलांनी केली होती. 
 
 
 
 
 
 
 
मात्र, सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आजच यावर तातडीने सुनावणी घेणे गरजेचे नसल्याचेही स्पष्ट केले. सीबीआयने आधी कोर्टात पुरावे सादर करावेत त्यानंतर याप्रकरणी सुनावणी घेण्यात येईल असे कोर्टाने म्हटले आहे. काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी याप्रकरणी पश्चिम बंगाल सरकारची बाजू सुप्रीम कोर्टात मांडत आहेत.