स्वराली जाधवने पटकावला राजगायिका होण्याचा मान
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :04-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
कलर्स मराठी वाहिनीवरील सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर या कार्यक्रमाचे विजेता घोषित करण्यात आले. कार्यक्रमाला मिळालेले अंतिम सहा शिलेदार – स्वराली जाधव, मीरा निलाखे, सई जोशी, उत्कर्ष वानखेडे, चैतन्य देवढे आणि अंशिका चोणकर या सहा स्पर्धकांमध्ये सुवर्ण कट्यार मिळवण्यासाठी महासंग्राम रंगला होता . गानसम्राज्ञी आशाताई भोसले यांच्या हस्ते विजेत्याला सुवर्ण कट्यार देण्यात आले असून स्वराली जाधव हिने सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर कार्यक्रमाची राजगायिका होण्याचा मान पटकावला.
 
 
स्वराली जाधवला कलर्स मराठीतर्फे एक लाखाचा धनादेश, मानाची सुवर्ण कट्यार आणि केसरी टूर्स तर्फे स्टुडन्ट स्पेशल नासा यूएसए टूर – ज्यामध्ये युनिव्हर्सल स्टुडीओज आणि डिझनीलैंड बरोबर मनोरंजन आणि ऍडव्हेंचर थीम पार्क बघण्याची सुर्वणसंधी मिळणार आहे. तर पाच छोट्या सुरवीरांसोबत मॉनिटरला देखील कलर्स मराठी तर्फे एक लाखाचा धनादेश आणि केसरी टूर्स तर्फे स्टुडन्ट स्पेशल हिमाचल प्रदेशचा दौरा ही विशेष भेट मिळाली.