आता ट्विटही एडिट करता येणार !
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :04-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली, 
 
 
 
लोकप्रिय मायक‘ो ब्लॉिंगग प्लॅटफॉर्म ट्विटरवर लवकरच केलेले ट्विट एडिट करण्याचा पर्याय येण्याची शक्यता आहे. यासाठी कंपनी एक नवे फीचर लॉंच करणार असल्याचं वृत्त आहे. या फीचरद्वारे आधीचे (ओरिजिनल) ट्विट देखील इतरांना दिसेल. तसेच, नव्याने एडिट केलेले ट्विट देखील असेल.
 
 
 
ट्विटरचे सीईओ जॅक डोर्से यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्विट एडिट करण्यासाठी एक 5 ते 30 सेकंदांचे डिले फिचर आणले जाऊ शकते. आतापर्यंत हे फीचर का नव्हते, या प्रश्नावर उत्तर देताना डोर्से म्हणाले की, ट्विटरची निर्मिती मेसेजच्या प्लॅटफॉर्मवर करण्यात आली आहे. एकदा मेसेज पाठवल्यानंतर तो डीलीट करता येत नाही. त्याप्रमाणे एकदा ट्विट केल्यानंतर ते ट्विट जगभरात जाते. लवकरच ट्विट एडिट करण्यासाठी एक 5 ते 30 सेकंदांचे डिले फिचर येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. गेल्या काही वर्षांपासून असे फीचर उपलब्ध करून देण्याबाबती युजर्सकडून केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.