अभिनेत्री शिल्पा शिंदेचा काँग्रेस मध्ये प्रवेश
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :05-Feb-2019
मुंबई :
'भाभी जी घर पर है' या मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे आता राजकारणाच्या रिंगणात उतरली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत शिल्पाने आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
 
 
'भाभी जी घर पर है' या मालिकेतील अंगुरी भाभीच्या व्यक्तिरेखेमुळे शिल्पा प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यानंतर तिने ऑक्टोबर २०१७ मध्ये  'बिग बॉस ११' स्पर्धेचा खिताबही जिंकला होता. 
 
 
मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांशी झालेल्या वादामुळे शिल्पाने ही मालिका सोडली होती. त्यानंतर ती छोट्या पडद्यापासून दूर होती. मात्र आता ती एका नव्या भूमिकेत चाहत्यांसमोर येणार आहे.