अक्षयसोबत काम करणे अशक्य - शाहरुख खान
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :05-Feb-2019
मुंबई :
शाहरुख खान आणि अक्षय कुमार ही दोन बॉलीवूडमधील दोन सुपरस्टार आहेत. या दोघांनी अभिनयाच्या जोरावर स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. या दोघांचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहे. मात्र, या दोघांना फार कमी वेळा एकत्र  शेअर केली आहे. त्यामुळे या दोघांनी मिळून चित्रपट करावा अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. मात्र, शाहरुखने अक्षयसोबत स्क्रीन शेअर करण्यास नकार दिला आहे.

 
 
‘अक्षय आणि मी एकत्र काम करणे तसे अशक्य आहे. कारण त्याच्या आणि माझ्या वेळा जमून येणे शक्य नाही. अक्षय प्रचंड वक्तशीर व्यक्ती असून मी त्याच्या विरुद्ध आहे. त्यामुळे आम्ही एका चित्रपटात काम करणे आमच्यासाठी अवघड आहे’, असे  शाहरुखने सांगितले.
 
तो पुढे म्हणाला की, ‘अक्षयच्या दिवसाची सुरुवात फार लवकर होते. त्यामुळे तो कामालाही लवकर लागतो. मात्र माझे  तसे नाही. जेव्हा मी माझ्या चित्रपटाचे चित्रीकरण संपवतो तोपर्यंत मला खूप उशीर झाला असतो. मी काम करताना कधी वेळ पाहत नाही. त्यामुळे आमच्या कामाच्या वेळा जुळून येणे फार कठीण आहे’.
दरम्यान, ‘अक्षयसोबत काम करण्याची संधी मिळाली तर चांगलेच आहे. मला त्याच्यासोबत काम करायला नक्कीच आवडेल. मात्र, आम्ही एकाच चित्रपटात काम केलं तरीदेखील आमची भेट होणं अशक्य असल्याचं दिसून येते’, असेही त्याने सांगितले.