ज्युनियर राष्ट्रीय कुस्तीत महाराष्ट्राला दोन सुवर्णपदक
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :05-Feb-2019
सुरत : येथे पार पडलेल्या राष्ट्रीय ज्युनियर कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्रासह दिल्ली, हरयाणा व सेनादल संघानी प्रत्येकी दोन सुवर्णपदकांची कमाई केली. फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात महाराष्ट्राच्या विजय (५७ किग्रॅ ) व हर्षदने (९७ किग्रॅ ) आपापल्या वजनगटात वर्चस्व गाजवले.
 

 
 
दिल्लीच्या सुमित गुलिया (८६ किग्रॅ), अनिरुद्धने (१२५ किग्रॅ), हरयाणाच्या विशाल कालीरामन (७० किग्रॅ ) व विकासने (६५ किग्रॅ ), तर सेनादलाच्या आकाश दहिया (६१ किग्रॅ ) व विक्कीने (९२ किग्रॅ ) यांनी सुवर्णपदक पटकावले. हरयाणाने १९० गुणांसह सांघिक अजिंक्यपद मिळविले. दिल्लीने (१५० गुण) दुसरे, तर सेनादलाने (१२४) तिसरे स्थान प्राप्त केले.