उद्धव ठाकरे सगळी समीकरणे ठरवत आहेत : संजय राऊत
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :05-Feb-2019
- राऊत यांच्याकडून युतीचे संकेत  
 
मुंबई :
शिवसेनेचे खासदार व महत्त्वाच्या नेत्यांची मातोश्रीवर बैठक झाली. या बैठकीनंतर खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना, आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती आणि समीकरणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवत आहेत. लोकसभेची गणते आणि समीकरणे जुळत आहेत, असे म्हणत राऊत यांनी आगामी युतीचे संकेत दिले आहे. 
 

 
शिवसेना खासदारांची मातोश्रीवर बैठक झाली. या बैठकीला जदयुचे नेते आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर हेही उपस्थित होते. तर, भाजपाकडून मध्यस्थीसाठी प्रशांत किशोर आले होते का? , असा प्रश्न राऊत यांना विचारला असता, त्यावर प्रशांत किशोर हे घटकपक्षातील महत्त्वाचे सदस्य आहेत, जदयूचे नेते आहेत, त्यामुळे त्यांची ही केवळ सदिच्छा भेट होती, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
 
 
 
तर, शिवसेनेचा मुख्यमंत्री जनता ठरवेल आणि देशाचा पंतप्रधान शिवसेना ठरवेल, असेही राऊत यांनी सांगितले. शिवसेना उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार कामाला लागली आहे, असेही ते म्हणाले.