भाजपाने साकारले ‘हिटलर दीदी’ व्यंगचित्र
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :05-Feb-2019
लखनौ,
शारदा चिट फंड घोटाळ्याची चौकशी करण्यास गेलेल्या सीबीआय अधिकार्‍यांना बंगालमध्ये पोलिसांनी ताब्यात घेल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी धरणे आंदोलन सुरू केले. यावरून उत्तर प्रदेश भाजपाने ममता बॅनर्जींवर टि्‌वट करून निशाणा साधला. उत्तर प्रदेश भाजपाने ममता बॅनर्जी यांना हिटलरच्या रुपात दाखवले आहे. ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये हिटलरशाही करत असल्याची टीका भाजपाकडून करण्यात आली आहे.
 
 
 

 
 
 
 
 
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काही दिवसांपूर्वी रॅलीसाठी पश्चिम बंगालला जाणार होते. मात्र, त्यांच्या हेलिकॉप्टरच्या लँिंडगला पश्चिम बंगाल प्रशासनाने परवानगी नाकारली. त्यावरूनही उत्तर प्रदेश भाजपाने ममतांवर व्यंगचित्राच्या माध्यमातून निशाणा साधला. आदित्यनाथ हेलिकॉप्टरमधून उतरण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, हेलिपॅडवर काटे असल्यामुळे त्यांचे हेलिकॉप्टर खाली उतरू शकत नाही, असे व्यंगचित्र भाजपाने टि्‌वटर हॅण्डलवरून प्रसिद्ध केले आहे.
 
 
 
 
 
 
 
तिसर्‍या व्यंगचित्रात सीबीआय अधिकारी एका िंपजर्‍यात दाखवले गेले आहेत. या िंपजर्‍याची चावी बंगाल पोलिसांच्या हातात आहे. देशातील जनता तुमची कृत्ये पाहते आहे हिटलर दीदी. तुम्हाला आणि तुमच्या महाआघाडीतील साथीदारांना जनता नाकारेल, यात शंका नाही, अशा शब्दांमध्ये भाजपाने ममता यांना लक्ष्य केले आहे. ममता बॅनर्जी यांनी गेल्याच महिन्यात कोलकात्यात देशातील 22 पक्षांच्या नेत्यांना एकत्र आणत एक मोठी सभा घेतली. यानंतर आता सीबीआय विरुद्ध ममता या संघर्षात जवळपास 20 पक्षांनी ममता यांना पािंठबा दिला आहे. त्यावर भाजपाने व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका केली आहे.