रहिवाशी इमारतीला भीषण आग - 7 जणांचा मृत्यू; 28 जखमी
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :05-Feb-2019
पॅरिस,
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये मंगळवारी सकाळी एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. रहिवाशी इमारतीला ही आग लागली असून यामध्ये 7 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. याशिवाय 28 जण जखमी झाले आहेत.
 

 
 
 
 
 
वृत्त लिहित असताना घटनास्थळी अग्निशमन दलाकडून आगीवर ताबा मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. आठ मजली इमारतीच्या सातव्या आणि आठव्या मजल्यावरील आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. या घटनेत अग्निशमन विभागाचेही 3 कर्मचारी जखमी झाल्याचे सांगण्यात आले. आग लागण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. या घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्तकेली जात आहे.