सर्व मागण्या मान्य, अण्णांचे उपोषण मागे - सहा तास चालली मुख्यामंत्र्यांसोबत चर्चा
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :05-Feb-2019
राळेगणसिद्धी,
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाच्या सात दिवस आहे. लोकपाल नियुक्तसाठी उपोषणावर असलेल्या अण्णा हजारेंच्या मनधरणीचे सरकारचे प्रयत्न सफल ठरत नाही आहेत. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय कृषि मंत्री राधा मोहन सिंह यांनी अण्णांची बैठक घेतली.
 
 

 
 
मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय कृषि मंत्री राधा मोहन सिंह यांची अण्णा हजारेंबरोबर बंद दाराआड चर्चा संपन्न झाली आहे. मुख्यमंत्र्यांकडून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु आहे. मात्र सर्व मागण्या जोपर्यत मान्य होत नाहीत तोवर उपोषण सोडणार नसल्याचा पवित्रा अण्णांनी घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री अण्णांच्या मागण्या मान्य करतात का? तर अण्णा उपोषण सोडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
 
 
 
दरम्यान लोकपाल, लोकनियुक्ती आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव या मागणांसाठी गेल्या आठवडाभरापासून अण्णा उपोषणावर आहेत. उपोषणामुळे अण्णांचं वजन साडे पाच किलो घटलंय. त्यामुळे अण्णांची प्रकृतीही ढासळतेय.