ममतांचे धरणे आंदोलन मागे
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :05-Feb-2019
कोलकाता,
सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर सायंकाळी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारविरुद्धचे आपले धरणे आंदोलन आज मंगळवारी सायंकाळी मागे घेतले.
 
 
 

 
 
 
काही राजकीय पक्षांचे नेते माझ्या भेटीला आले आणि त्यांनी मला आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. त्यातच सर्वोच्च न्यायालयानेही आम्हाला दिलासा दिला आहे, त्यामुळे मी आपले आंदोलन मागे घेत असल्याचे ममतांनी पत्रपरिषदेत सांगितले. रविवारी रात्री सीबीआयचे अधिकारी कोलकात्याचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांची चिटफंड घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी गेले असता, पाच अधिकार्‍यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर केंद्र सरकार आम्हाला त्रास देत आहे, लोकशाही धोक्यात आली असल्याचा आरोप करून ममता त्याच रात्री उशिरा धरणे आंदोलनावर बसल्या होत्या.