ममता आणि धरणे आंदोलन संबंध
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :05-Feb-2019
कोलकाता,
ममता बॅनर्जी आणि धरणे आंदोलन यांचे नाते जुनेच आहे. ममता यांच्या राजकीय उदयाचा पायाच आंदोलनांमधून रोवला गेला. सुरुवातीपासूनच आक्रमक बाणा आणि रस्त्यावरची लढाई ही त्यांची मूळ ओळख राहिली आहे.
 
 

 
 
 
नवद्दीच्या दशकात युथ कॉंग्रेसचे नेतृत्व करीत असताना ममता यांनी पहिल्यांदा तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बासू यांच्या दालनाबाहेर धरणे दिले होते. एका बलात्कार पीडितेला न्याय देण्यासाठी ममता थेट सरकारचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या रायटर्स बिल्डिंगमध्ये घुसल्या आणि आंदोलन सुरू केले. त्यावेळेस त्यांना पोलिसांकडून जबर मारहाण झाली होती. पण याच आंदोलनानंतर ममता दीदी पहिल्यांदा प्रकाशझोतात आल्या.
 
 
 
त्यानंतर तब्बल तेरा वर्षांनी 2006 मध्ये िंशगुरमधल्या शेतकर्‍यांची शेकडो एकर जमीन टाटा मोटर्सच्या नॅनो प्लांटला देण्यास विरोध करण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्कसिस्ट) तत्कालीन मुख्यमंत्री बुधदेव भट्टाचार्य यांच्या डाव्या आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन उभारले. यावेळेस दीदींचे धरणे कोलकात्याच्या धरमतल्ला परिसरात तब्बल 26 दिवस चालले. त्यानंतर 2007 मध्ये नंदीग्राम येथे प्रस्तावित पेट्रोलियम हबच्या विरोधात मोठा लढा उभारला आणि 2011 च्या निवडणुकीत डाव्यांना याची मोठी िंकमत चुकवावी लागली.
 
 
 
मात्र, आज 2019 ला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदावर असूनही ममता दीदींनी सीबीआयच्या कारवाईविरोधात पुन्हा एकदा धरणेअस्त्र उपसले आहे. तेही त्याच धरमतल्लाच्या मेट्रो सिनेमा परिसरात. यावेळेस निशाण्यावर केंद्रातले मोदी सरकार आहे आणि पाठीशी देशभरातली अर्धा डझन विरोधी पक्षांचे कडबोळे. त्यामुळे िंशगुरच्या आंदोलनाने ममता दीदींना मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहचवले, आता मोदी विरोधात सुरू असलेले धरणे त्यांना पंतप्रधानपदापर्यंतची मजल गाठण्यात मदत करेल, असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.