मेक्सिको सीमेवर अमेरिकेचे आणखी सैनिक तैनात
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :05-Feb-2019
वॉशिंग्टन,
मेक्सिको सीमेवर आणखी 3,750 सैनिक तैनात करण्याचा निर्णय अमेरिकेच्या पेंटेगॉनने घेतला आहे. मेक्सिको सीमेवर अमेरिकेतर्फे आणखी 150 किलोमीटर्स लांबीचे काटेरी तारेचे कुंपण उभारण्यात येणार असून आणि कस्टम आणि सीमा सुरक्षेसाठी आणखी सोईसुविधा निर्माण करण्यात येणार असल्याचेही पेंटेगॉनने म्हटले आहे.
 
 
 
 
 
हे 3,750 सैनिक मेक्सिको सीमेवर पाठवण्याच्या निर्णयानंतर अमेरिका-मेक्सिको सीमेवर तैनात करण्यात आलेल्या एकूण अमेरिकन सैनिकांची संख्या आता 4,350 इतकी होणार आहे. ही कारवाई प्रभारी संरक्षण सचिव पॅट शॅनाहन यांनी मंगळवारी दिलेल्या संकेतानुसारच असून त्यांनी पुढील लष्करी कारवाईचे अंदाजपत्रकही दिले होते, त्याचा टीकाकारांनी व्हाईट हाऊसचे एक लष्करी कारस्थान म्हणून उपहास केला होता.
 
 
सीमाक्षेत्रावर देखरेख ठेवण्यासाठी, नवीन बीएमएस (बॉर्डर मॉनिटरिंग सिस्टिम) उभारण्यासाठी हजारो सैनिक तैनात करण्यात येणार असल्याचे पॅट शॅनाहन यांनी सांगितले होते. नवीन देखरेख मोहीम 30 सप्टेंबरपर्यंत चालणार असल्याचे अमेरिकेतर्फे जाहीर करण्यात आले आहे.