स्मृती मंधानाचा विक्रम; न्यूझीलंडविरुद्ध झळकावले सर्वात जलद अर्धशतक
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :06-Feb-2019
 
 
 
 
 
 
नुकत्याच जाहीर झालेल्या एकदिवसीय क्रमवारीत स्मृती मंधानाला अव्वल स्थान मिळाले असून  सध्या ती आपल्या क्रिकेट कर्तृत्वामुळे चर्चेत आहे.  न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी२० मध्ये तिने अर्धशतक ठोकून सर्वात जलद अर्धशतक ठोकणारी भारतीय महिला क्रिकेटपटू होण्याचा मान मिळवला आहे. स्मृतीने २४ चेंडूत हे अर्धशतक ठोकले.
 
 
 
 
 
  
न्यूझीलंडने भारताला १६० धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना स्मृतीने ५८ धावा काढले. यात ७ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. कोणत्याही भारतीय महिला क्रिकेटपटूने झळकावलेले हे सर्वात जलद अर्धशतक ठरले. या आधीचे सर्वात जलद अर्धशतकदेखील तिच्याच नावे होते. २५ चेंडूत तिने हे अर्धशतक झळकावले होते. इतकेच नव्हे तर ५ सर्वात जलद अर्धशतकेदेखील तिच्याच नावे आहेत.