रजिस्ट्रेशन नंबर मिळविण्यासाठी खर्च केले ३१ लाख रुपये !
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :06-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
कार, बाइक किंवा मोबाइल फोनसाठी आपल्या आवडीचा नंबर तयार करण्यासाठी अनेकजण अतिरिक्त रक्कम खर्च करतात. मात्र, आपल्याला हवा असलेला नंबर मिळवण्यासाठी केरळ मधील एका व्यक्ती ने ३१ लाख रुपये खर्च केले आहे. 
 
 
 
 
 
केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथे सोमवारी विभागीय परिवहन अधिकाऱ्याने यूनिक नंबर ‘केएल ०१ सीके १’ साठी लिलाव आयोजित केले होते. या यूनिक नंबरसाठी बोली लागली असताना तिरुवनंतपुरमचे फार्मास्यूटिकल डिस्ट्रिब्यूटर असलेले के. एस. बालगोपाल यांच्यासह दुबईचे दोन अनिवासी भारतीय आनंद गणेश आणि शाइन युसूफ हे देखील सहभागी झाले होते.
केएल ०१ सीके १ या नंबरची बोली ५०० रुपयांपासून सुरू झाली. ही बोली १० लाखांपर्यंत पोहोचल्यानंतर आनंद गणेश लिलावातून मागे हटले. २५.५ लाख रुपयांची बोली लागेपर्यंत शाइन युसूफ स्पर्धेत टिकून होते. मात्र, बालगोपाल यांनी ३० लाख रुपयांची बोली लावली आणि युसूफ मागे हटले. बालगोपाल यांनी ही बोली जिंकली. त्यांनी या बोलीसाठी ३१ लाख रुपये भरले. यात ३० लाख रुपये बोलीची रक्कम आणि १ लाख रुपये अर्जासाठी दिले गेले.
 
यापूर्वी के. एस. बालगोपाल यांनी हा यूनिक नंबर आपल्या पोर्श ७१८ बॉक्सटर स्पोर्ट्स कारसाठी घेतला होता . या कारची किंमत सुमारे १.२ कोटी रुपये आहे. बालगोपाल यांनी पहिल्यांदाच अशा प्रकारे यूनिक नंबर घेतलेला नसून यापूर्वी त्यांनी आपल्या टोयोटा लँड क्रुझरचा रजिस्ट्रेशन नंबर केएल ०१ सीबी १ साठी १९ लाख रुपये खर्च केले होते. यापूर्वी कारसाठी देशात सर्वात महागडा रजिस्ट्रेशन नंबर सुमारे सात वर्षांपूर्वी हरियाणामध्ये २६ लाख रुपयांत खरेदी करण्यात आले होते.