प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याचा राकाँचा प्रयत्न
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :06-Feb-2019
- जयंत पाटील यांची माहिती
 
नागपूर, 
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भारिप बहुजन महासंघाला महाआघाडीत सोबत घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या विचारात आहे. याकरिता भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅण्ड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सरू असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
 
 
 
एका कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरात आलेल्या जंयत पाटील यांनी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पाटील पुढे म्हणाले की, भारिपसारख्या समविचारी पक्षाने राष्ट्रवादीसह महाआघाडीत येऊन निवडणूक लढायला हवी. हे पक्ष जर वेगवेगळे लढले तर त्याचा फायदा विरोधी पक्षांना होईल. अ‍ॅड. आंबेडकर सोबत आल्याने आंबेडकरी जनतेच्या मतांमध्ये विभाजन होणार नाही, तसेच महाआघाडीला बळ मिळेल. त्यांना सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शेवटपर्यंत प्रयत्नशील असणार आहे, असेही जंयत पाटील म्हणाले. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राकाँचे शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.