मानोरा,
तालुक्यातील सोमठाणा येथील शेत शिवारात मोकाट असलेल्या गायी ६ फेब्रुवारीच्या पहाटेस विहिरीत पडल्याची माहिती मिळताच सकाळी स्थानीक युवकांनी शर्थीचे प्रयत्न करुन गायींना जिवनदान दिले. विहिरीत पडलेल्या चार पैकी तीन गायींना वाचविण्यात यश आले तर एका गायीचा मृत्यू झाला.
सोमठाणा गावातील शेतकरी गजानन कोन्हे यांच्या शेतातील विहिर भुईसपाट आहे. रात्रीदरम्यान मोकाट गायी चरत असतांना अचानक विहिरीत पडल्या. ही बाब गजानन कोन्हे यांना समजताच त्यांनी याबबातची माहिती गावातील युवकांना दिली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून विहिरीत पडलेल्या गायींना वाचविण्यासाठी जीव धोक्यात घालून विहिरीत उतरले.
अथक परिश्रमाअंती तीन गायींना वाचविण्यात यश मिळविले. मात्र, एका गायीला वाचवू शकले नाही. गायींना वाचविण्यासाठी रामहरी खुपसे, गोपाल शिंदे, तेजस खुपसे, राजु गोदमले, लक्ष्मण खुपसे, कैलास शिंदे, शाम ठाकरे, विष्णु कवाने, राहुल खुपसे यांनी शर्थीचे प्रयत्न केले.