' कूली नं. १ ' चे बनणार रिमेक; वरुण धवन मुख्य भूमिकेत
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :06-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
गोविंदा-करिश्माच्या केमिस्ट्रीमुळे सुपरहिट ठरलेल्या ‘कूली नं. १’ चा रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात वरुण धवन मुख्य भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. 
१९९५ साली प्रदर्शित झालेल्या गोविंदा-करिश्माच्या ‘कूली नं. १’ ला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते . त्याची गाणी आजही हिट आहेत. या चित्रपटाचा रिमेक करण्याचा निर्णय धवन कुटुंबीयांनी घेतला आहे. या चित्रपटाची निर्मिती वरुणचा भाऊ रोहित धवन करणार आहे तर चित्रपटाचे दिग्दर्शन डेव्हिड धवन करणार असल्याचे बोलले  जात आहे.
‘कूली नं. १’च्या रिमेकच्या चित्रीकरणाला जूनमध्ये सुरुवात होईल. या चित्रपटात वरुणसोबत आलिया भट्टची वर्णी लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.