ट्रॅक्टरने मुलाला चिरडले; संतप्त जमावाकडून चालकाची हत्या
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :06-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
अहमदनगर
 
श्रीरामपूर तालुक्यातील उक्कल गावात ट्रॅक्टरच्या धडकेत ऊसतोड मजुराचा तीन वर्षीय मुलगा सोहम कन्हैयालाल मोरे (वय-३) याचा मृत्यू झाला. सोहम याला ट्रॅक्टरने धडक दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या आठ ते दहा ऊसतोड मजुरांनी ट्रॅक्टरचालकाला बेदम मारहाण केली. लाठ्याकाठ्या आणि कोयत्याने त्याच्यावर वार करण्यात आले. बेदम मारहाणीमुळे जखमी झालेल्या थोरात याचाही मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेतले आहे.