क्रिप्टोकरन्सीच्या पासवर्डसह सीईओ चे निधन
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :06-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
वॉशिंग्टन:
 
 
 
कॅनडाच्या क्लवाड्रिगासीएक्स या क्रिप्टोकरन्सी कंपनीचा ३० वर्षीय सीईओ गेराल्ड कोटेन याचे भारतात निधन झाले आहे. कोटेनच्या मृत्यूसोबतच १३०० कोटी रुपये (१९० मिलिअन डॉलर) किंमतीच्या क्रिप्टोकरन्सीचा पासवर्डही त्याच्यासोबत गेला आहे. हा पासवर्ड केवळ त्यालाच माहिती असून टॉप सिक्युरिटी एक्सपर्टही हा पासवर्ड अनलॉक करण्यास असमर्थ ठरले आहेत. यामुळे आता लोकांचे कोट्यवधी रुपये बुडाले आहेत. कोटेनच्या पत्नीलाही हा पासवर्ड माहिती नाही.
 
 
 डिसेंबर २०१८मध्ये आतड्यांशी संबंधित एका आजारामुळे गेराल्डचा मृत्यू झाला. भारतातील अनाथ मुलांसाठी गेराल्डला भारतात एक अनाथाश्रम सुरू करायचा होता. त्या निमित्ताने तो भारतात आला होता असे सांगितले जात आहे.
 
 
गेराल्डची पत्नी जेनिफर रॉबर्टसन आणि तिच्या कंपनीने कॅनडाच्या कोर्टात क्रेडिट संरक्षणाबाबतची याचिका दाखल केल्यानंतर गेराल्डचा मृत्यू झाल्याचे समजले. आम्ही गेराल्डचे इन्क्रिप्ट अकाउंट (ज्यात गेराल्डची संपत्ती आहे) उघडण्यास असमर्थ आहोत, असे याचिकेत म्हटले आहे. गेराल्डच्या अकाउंटमध्ये सुमारे १९० मिलियन डॉलरची क्रिप्टोकरन्सी बंदिस्त असल्याचे याचिकेत म्हटले आहे. गेराल्ड ज्या लॅपटॉपवर काम करत असे, तो इन्क्रिप्टेड आहे आणि त्याचा पासवर्ड त्याची पत्नी जेनिफर हिच्याकडेही नाही.