पशुपालन विभागातल्या अधिकाऱ्यांना अटक; सव्वा लाखाचे केले शेण चोरी
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :06-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
कर्नाटक
 
 
 चिकमंगळुरू जिल्ह्यातील बिरूर येथे  तब्बल सव्वा लाखाचे गायीचे शेण चोरीला गेले आहे. ही शेणाची चोरी कोणत्या सराईत चोराने नाही तर एका पशुपालन विभागातल्या सरकारी कर्मचाऱ्याने केली आहे. \पोलिसांनी त्याला अटक केले आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक पशुपालन विभागाच्या अमृतमहल स्टॉकमधून अचानक ३५-४० किलो शेण नाहीसे झाले. पशुपालन विभागाच्या संचालकांनी शेण चोरीला गेल्याची तक्रार बिरूर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनी तपास केला असता हे शेण अमृतमहलच्याच एका निरीक्षकाने चोरल्याची बाब स्पष्ट झाली आहे. या निरीक्षकाने एका मित्राच्या शेतावर सारे शेण लपवून ठेवले होते. या शेणाचा वापर प्रामुख्याने शेतातील खतासाठी होतो. तेव्हा हे शेण विकून  पैसे कमवण्याचा अधिकाऱ्याचा विचार होता.
पोलिसांनी या दोन्ही शेणचोरांना अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे.