भूगर्भीय हालचालींमुळे उत्तर दिशा बदलते आहे ?
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :06-Feb-2019
 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 वॉशिंग्टन 
 
 
भूगर्भीय हालचालींमुळे पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाची जागा दरवर्षी ५५ किलोमीटरने बदलते आहे. यामुळे उत्तर दिशेचीही जागा बदलत असल्याचं स्पष्ट झालं आहे. यासंदर्भात एक दीर्घ अहवालच शास्त्रज्ञांनी सोमवारी सादर केला आहे. उत्तर ध्रुवाची जागा ही १८३१ पासून बदलते आहे. दर पाच वर्षांनी त्याजागेत बदल होत होता. पण गेल्या काही वर्षात उत्तर ध्रुवाची तबकडी वेगाने सरकते आहे. त्यामुळे उत्तर ध्रुवाचे स्थान आणि पर्यायाने उत्तर दिशाही बदलते आहे. त्यामुळे उत्तर कोणती याच्या मोजमापात पेच निर्माण होतो आहे.
 
 
उत्तर दिशेची जागा ठरवण्याचे काम उत्तर ध्रुव तर दक्षिण दिशेची जागा ठरवण्याचे काम दक्षिण ध्रुव करतो. या दोन्ही दिशांवरून उरलेल्या दिशा ठरत असतात. पृथ्वीवरील सर्व खंड काही भूतबकड्यांवर उभे आहेत . भुगर्भीय हालचालींमुळे या भूतबकड्या सतत सरकत असतात. यामुळे कोट्यावधी वर्षांनंतर खंडांची जागाही पूर्णपणे बदलते.
 
 
 
सध्या उत्तर ध्रुवाची तबकडी वेगाने सरकते आहे. उत्तर ध्रुव सायबेरियापासून दूर चालला आहे. पण उत्तर ध्रुवाची जागा बदलत असल्यामुळे आधुनिक कम्पासतही दरवर्षी उत्तर थोडे थोडे बदलताना दाखवतात. कम्पासवरची उत्तर दरवर्षीच बदलत असल्यामुळे विमानं, सैनिक, जंगलातील प्रशासक , उपग्रह या सगळ्यांसाठी नक्की उत्तर कोणती हा पेच निर्माण होतो आहे.
 
 
 ज्याप्रमाणे उत्तर ध्रुवाची तबकडी सरकते आहे तशीच दक्षिण ध्रुवाचीही तबकडी सरकत असली तरी तिची गती मात्र अत्यंत मंद आहे. त्यामुळे दक्षिण ध्रुवाच्या जागेत कोणताही बदल आलेला नाही.