जीसॅट-३१ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :06-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
बुधवारी पहाटे 2.30 वाजता भारताच्या अवकाश संशोधन संस्थे(इस्रो)ने  उपग्रहांचे प्रक्षेपण करणाऱ्या युरोपीय कंपनी एरियनस्पेसबरोबर मिळून नवा जीसॅट 31 हा उपग्रह लाँच केला. बुफ्रेंच गुएनातून हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला आहे असून  जीसॅट 31चं वजन 2535 किलोग्रॅम इतके आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून भूमी आणि द्वीप समूहांना सेवा प्रदान करण्यात येणार आहे.
 
 
 
टीव्ही अपलिंक, डिजिटल सेटलाइट न्यूज एकत्रीकरण, डीटीएच टीव्हीसारख्या सेवा हे उपग्रह पुरवणार आहे. तसेच यशस्वी प्रक्षेपणानंतर हा ग्रह 15 वर्षं सेवा देणार आहे.  हा उपग्रह क्यू बॅन्ड ट्रांसपॉन्डर्सची क्षमता वाढवणार आहे. अवकाशातल्या कक्षेच्या आतील भागातील इतर उपग्रहांचे संचालन संबंधी सेवांना कार्यान्वित ठेवण्यासाठी हा उपग्रह मदत करणार आहे.
 
 
 
 जीसॅट 31 उपग्रहाला इस्रो परिष्कृत I-2K बेसमध्ये स्थापित करणार आहे. हा उपग्रह इस्रोच्या इनसॅट/जीसॅट उपग्रह श्रेणीच्या उपग्रहांना उन्नत करणार आहेत. उपग्रह भारतीय भू-भाग आणि द्वीप समूहाला सेवा पुरविणार आहे. इस्रोनुसार, उपग्रह व्यापक बँड ट्रान्सपोंडरच्या मदतीने अरबी समुद्र, बंगालची खाडी आणि हिंद महासागरात संचाराची सुविधा पुरविणार आहे. जीसॅट 31 हा देशाचा 40वा संचार उपग्रह आहे