बॉलिवूडच्या ' पप्पू पॉलिस्टर ' चे हृदयविकाराने निधन
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :06-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
बॉलिवूडमध्ये 'पप्पू पॉलिस्टर'च्या नावाने ओळखले जाणारे विनोदवीर अभिनेते सैयद बद्र उल हसन यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. गेल्या पाच दिवसांपासून ते अंधेरीतील रुग्णालयात उपचार घेत होते.
 'ओम नम: शिवाय' मालिकेतील त्यांचा नंदी आणि  'द स्वॉर्ड ऑफ टीपू सुल्तान' मालिकेतील मैसूरच्या महाराजांची दमदार भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.. 'जोधा-अकबर', 'फिर भी दिल है हिन्दुस्तानी' चित्रपटांतील त्यांच्या भूमिकाही गाजल्या.
सैयद बद्र उल हसन हे शास्त्रीय नर्तकही होते. गेली २५ वर्ष ते या  क्षेत्रात कार्यरत होते. अनेक मालिका, चित्रपट, जाहिरांतीमध्ये त्यांनी काम केले आहे.