कायदेशीर मार्गाने येणार्‍या निर्वासितांचे स्वागत; डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :06-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
वॉिंशग्टन, 
 
 
गुणवत्तेच्या आधारावर आणि कायदेशीर मार्गाचा स्वीकारून अमेरिकेत येणार्‍या सर्व निर्वासितांचे माझे सरकार स्वागतच करेल, पण बेकायदेशीर निर्वासितांचे लाड पुरविणे, त्यांना पाठीशी घालणे मला शक्य नाही. अमेरिकेत घुसखोरी करून येणे ही माझ्या दृष्टीने कू‘रताच आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज बुधवारी स्पष्ट केले.
ट्रम्प यांनी आज राष्ट्राला संबोधित करणार्‍या आपल्या भाषणात आपली भूमिका स्पष्ट केली. स्थानिक नागरिकांचे हित आणि रोजगाराचे रक्षण करण्यासाठी इमिग‘ेशन व्यवस्था कडक करणे, हे माझ्या सरकारचे कर्तव्यच आहे. आमच्या शेजारील मेक्सिको देशात कुठलीही कायदा व सुव्यवस्था नाही, या देशातून हजारो विदेशी नागरिक घुसखोरी करून अमेरिकेत येत असतात. यामुळे अमेरिकेची सुरक्षा धोक्यात आली असून, या सीमेवर िंभत बांधण्याच्या पर्यायावर मी आजही ठाम आहे, असे ट्रम्प यांनी सांगितले.
 
 
किम जोंग यांच्यातील दुसरी बैठक 27 रोजी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांच्यातील दुसरी बैठक 27 आणि 28 फेब‘ुवारी रोजी व्हिएतनाम येथे आयोजित करण्यात आली आहे.
उत्तर कोरियाकडे असलेली घातक अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र कायमची नष्ट करण्याच्या मुद्यावर ट्रम्प आणि किम जोंग यांच्यात पहिली बैठक गेल्या वर्षी िंसगापूर येथे झाली होती. त्याचवेळी दोन्ही नेत्यांनी, आम्ही पुन्हा लवकरच भेटणार असल्याचे स्पष्ट केले होते.